रविवार, १७ एप्रिल, २०११

प्रस्तावना

पं. सुरेश सामंत हे नाव कलेशी संबंधीत असणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे. साऱ्या हिंदुस्थानात त्यांचे नाव आहे. पंडित जी. एल. सामंत हे सुरेश सामंतांचे गुरु व वडिल देखील आहेत. पं. सामताप्रसाद (पं. गुदई महाराज) पं. किशन महाराज पं. वल्ले मामा आदि मोठमोठ्या दिग्गज महारथींबरोबर पं. जी. एल. सामंतांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्याच तालमीत तयार झालेले पं. सुरेश सामंत हे होत. त्यांनी स्वतः स्टेज गाजवले नाही. पण त्यांनी पडद्यामागची भुमिका घेऊन असे काही शिष्य घडवले व आजही घडवत आहेत की, जे आज  स्टेज गाजवत आहेत. त्यांचा प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने जगात वावरत आहे. तबल्याबरोबर ते शिष्यांना वेळोवेळी देशाचा चांगला नागरिक कसा बनावा हाही धडा ते शिकवत असतात. त्यांचा क्लास हा परिपुर्ण असा आहे. दुर दुरुन शिष्य त्यांच्याकडे येतात व चांगला तबला शिकतात. जे इतरांना जमले नाही, ते पं. सुरेश सामंत सरांनी करुन दाखवले आहे. उस्ताद झाकिर हुसेन यांनीही त्यांच्या क्लासवर येऊन सरांची तारिफ केली होती. हल्लीच्या स्पर्धेच्या कालात सरांनी आपल्या क्लासचे वैशिष्ठे सोडले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात अशी काय जादु आहे की, त्यांचा प्रत्येक विद्यार्थी चांगला घडला जातो? त्यांच्या स्वभावात काय जादु आहे की, मोठमोठे मी मी म्हणवणारे सुद्धा सरांचा आदर करतात?
साऱ्या पुण्यामधे त्यांच्या क्लाससारखा क्लास शोधुनही सापडणार नाही. सामंत सरांच्या स्वभावाचे पैलु मी श्रीमंत तालयोगी या सदरात क्रमशः लिहिणार आहे. त्यांच्यातील गुरुतत्वाची ओळख मला चांगल्या प्रकारे झाली आहे. त्यांचा व माझा परिचय दहा वर्षापासुनचा आहे. सामंत घराण्याशी, आमचे माळी घराणे हे एकजीव झाले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यांच्यावर काहीतरी लिहावे असे मला सारखे वाटत होते. सरांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना जवळुन बघितले. त्यांच्या कुटुंबाशी एकरुप झालो. त्यांचे सुख-दुःख बघितले, त्यांच्याच मार्गदर्शनाने मी लिहु लागलो. पण ते सारे लिखाण प्रसिद्ध करण्याचा योग येत नव्हता. म्हणतात ना, योग्य गोष्टी या योग्य वेळीच होत असतात. मी त्यांच्या वरचे लिखाण वेळोवेळी लिहित जाईल. कदाचित ते पुर्ण होण्यास विलंब देखील लागु शकेल. त्यांची माहिती लिहुन ते लिखाण ब्लॉगवर प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. पांडुरंग कृपेने हे लिखाण लवकरच परिपुर्ण  होईल असा मला आत्मविश्वास वाटतो.
सरांबद्दल माझे जे काही लिखाण असणार आहे, ते सरांच्या आतमध्ये दडुन राहिलेल्या गुरुतत्वाबद्दल. कारण सरांचे गुरुत्व, त्यांच्या ह्रदयात असणारी कळकळ याबद्दल मला नेहमीच नवल वाटत आले आहे. हा श्रीमंत तालयोगी ग्रंथ सगळ्यांनाच उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही. हे लिखाण पुर्ण व्हावे असे माझी पत्नी सौ. युगंधरा हिस नेहमी वाटत असे.
(क्रमशः)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा