अमोल माळी (पुणे)
औरंगाबाद, प्रथम क्रमांक (2008)
अमोल माळी हा पंडितजींचा विद्यार्थी. सहा वर्षापुर्वी तो पुण्याला तबला शिकण्यासाठी आला. त्याचे वडिल हे रायगड जिल्ह्यात आय.पी.सि.एल कंपनीत काम करत होते. मुलाच्या तबला प्रेमासाठी त्यांनी मुलाला पुण्याला तबला शिकण्यासाठी पाठवले. खुप मेहनत व गुरुंवरील निष्ठा यामुळे अमोलने तबल्यात खुपच प्रगती केली. त्याने आजपर्यंत खुपच पारितोषिके मिळावलेली आहेत. तबल्याच्या स्पर्धेत तो खुप वेळेस प्रथम क्रमांकाने आला आहे. त्याचा नम्र स्वभाव व तबला शिकण्याची आवड या गुणांमुळे तो सर्वांचा लाडका बनला आहे. सामंत सर त्याच्यावर खुप प्रेम करतात. या वर्षी अमोल पुण्याच्या ललित कला केंद्रात तबला शिकण्यासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. सारे मित्रमंडळी त्याच्यावर खुश आहेत. सामंत सरांचे मार्गदर्शन त्यास लाभते आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा